ladki bahin yojna : नेहमीच चर्चेमध्ये असणारी माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 2100 रूपये या योजनेद्वारे महिलांना थेट खात्यात पैसे पाठवले जातात. महायुतीच्या विजयानंतर लाडक्या बहिणींची डिसेंबर हफ्त्याविषयी जोरदार चर्चा चालू असल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या तिजोरीवर मोठा परिणाम पडू शकतो अशीही चर्चा चालू आहे. पण त्याचबरोबर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपमख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करून लाडक्या बहिणीला 2 ते 3 दिवसांत पैसे मिळण्याचे सांगितले आहे. आणि महत्वाचे म्हणजे माझी लाडकी बहिण योजनेचे निकष बदलणार नाहीत असे सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
आताची लाईव्ह बातमी
ladki bahin yojna : या योजनेमध्ये काही लाभरत्यांना पैसे मिळणार नाहीत असल्याच्या अफवा सोशल मीडिया वर पसरवल्या जात आहेत हे भ्रम दूर करण्यासाठी महीला व बालविकास कल्याण यांच्याकडून एक पत्र प्रसिध्द केलें आहे. व त्याचबरोबर कोणत्याही अफवाववर विश्वास ठेऊ नका असे माझी मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. ही योजना पुढे देखील मुख्यामांत्री देवेंद्र फडवीस, उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणी अजित दादा पवार यांच्या कडून कायम सुरळीत चालू राहणार असल्याचे देखील सांगितले आहे. व त्याप्रमाणे अर्जांची छाननी, तपासणी चालू झालेली आहे. त्यामुळे कोणतीही शंका मनामध्ये ठेऊ नका. सरकारने यासाठी नवीन नियम व अटी देखील लागू केले आहेत जेणेकरून गरीब महिलांनी जास्तीत जास्त लाभ घेता येईल.
हेही वाचा ⏭आता फ्री मध्ये लावा तुमच्या घरावर सोलर पॅनल,असे भरा फॉर्म : Solar rooftop
Table of Contents
योजनेचे नाव | मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना |
मर्यादा | महाराष्ट्र राज्य शासन |
लाभ घेणारे | महाराष्ट्रातील महिला |
वयोगट | 21 ते 65 |
रूपये रक्कम | 2100 रूपये |
अर्ज करण्याची पद्धत | online |
अर्ज करण्यासाठी पोर्टल | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
हेही वाचा ⏭शिक्षणासाठी मिळवा 10 लाखापर्यंत लोन,कसे मिळवायचे लोन ? सविस्तर जाणुन घ्या : pm vidya lakshmi
लाडकी बहिण योजनेतील अटी व शर्ती मध्ये नवीन बदल
- जर महिलेकडे 2 लाख रुपये उत्पन्नाचा दाखला नसेल तर, पिवळे आणि केशरी रेशनकार्ड लागेल त्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही.
- जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर रेशन कार्ड,मतदान कार्ड, जन्म दाखला यापैकी एक अनिवार्य आहे.
- योजनेचा लाभ कुटुंबातील अविवाहित महिलेला देखील घेता येणार आहे.
हेही वाचा ⏭pm vishwakarma yojna : आताच अर्ज करा आणि मिळवा 15,000 रुपये,पहा सविस्तर.
लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता ?
- अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावे.
- वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
- घरातील सदस्यांच्या नावावर चारचाकी (कार) नसावी (ट्रॅक्टर चालेल).
- महिलेच्या घरातील सदस्य शासनाचे विद्यमान,अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक, सदस्य नसावेत.
हेही वाचा ⏭pm kissan yojna : शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार 19 वा हफ्ता,आताच पाहा लाभार्थी यादी,पाहा सविस्तर.
माझी लाडकी बहिण योजना payment status कसे बघायचे
1 सर्वप्रथम https://pfms.nic.in/Home.aspx या वेबसाईट लिंक वर क्लिक करा.
2 त्यानंतर know your payment वर क्लिक करा.
3 त्यानंतर तुम्ही लाभ घेण्यासाठी जोडलेले खाते निवडा.
4 खाते क्रमांक अचूक पाने प्रदान करा.
5 तयानंतर catchpa भरून OTP या ऑप्शन वर क्लिक करा.
6 मोबाईलवर आलेला OTP भरून submit या बटणावर क्लिक करा.
7 अशाप्रकारे तुम्हाला पेमेंट स्टेटस ची तपशील जाणुन घेता येते.
यामध्ये तुम्हाला योजनेचे पैसे जमा झाले की नाही हे समजते.
लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे ?
महाराष्ट्रतील गरीब महिलांना आर्थकदृष्ट्या मदत करणे. महिलांना स्वावलंबी बनवणे. राज्यातील महिलांना व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांना आर्थकदृष्टया मदत म्हणून त्यांचे आरोग्य व पोषण स्तिथ सुधारणे.
लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या गोष्टी घरात नसावेत ?
1 घरातील सदस्यांच्या नावावर चारचाकी (कार) नसावी (ट्रॅक्टर चालेल).
2 कुटुंबातील सदस्य विद्यमान किव्वा माजी आमदार/माजी खासदार नसावे.
3 कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा अधिक नसावे.
4 कुटुंबातील सदस्य भारत सरकार किव्वा राज्य सरकारच्या कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य नसावेत.
5 कुटुंबातील सदस्य कर भरणारा (tax payer) नसावा.
6 लाभ घेणाऱ्या महिला शासनाच्या इतर योजनांद्वारे 1500 रुपये किव्वा त्यापेक्षा अधिक रक्कमेचा लाभ नाही घेतला पाहिजे.
लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यकच कागदपत्रे काय आहेत
1 आधार कार्ड.
2 अधिवास प्रमाणपत्र
3 प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / 4 शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
5 उत्पन्न प्रमाणपत्र.
6 महिलेचे फोटो.
7 बँक खाते (खाते आधार लिंक असावे).
लाडकी बहिण योजनेसाठी helpline number काय आहे ?
जर तुम्हाला संबंधित योजनेविषयी चर्चा व तक्रारीसाठी लाडकी बहिण योजनेसाठी हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक: 181आहे.