ladki bahin yojna: लाडकी बहिण योजना ही एक महाराष्ट्र राज्य सरकारची योजना असून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देत असते. नोव्हेंबर मध्ये ह्या रक्कमेत वाढ होऊन ती 2100 रुपये देखील झालेली आहे. ह्या योजनेसाठी आतापर्यंत 1 कोटी 12 लाख महिलांनी अर्ज भरला आहे व त्यांना लाभ ही मिळाला आहे.राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे व महिलांचे सक्षमीकरण व्हावे हा या योजनेचा हेतू आहे.
या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाचे नियम देखील रबिवण्यात आलेले आहेत. त्या नियमांचे पालन करून महिलांनी अर्ज भरायचा होता पण आतापर्यंत सर्वच महिलांनी अर्ज भरून लाभ घेतला आहे. पण आता महाराष्ट्र शासनाने यामध्ये लाडक्या बहिनिंसाठी कडक नियम लागू केले आहेत जेणेकरून गरीब महिलांनी लाडकी बहिण योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता आला पाहिजे व त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत झाली पाहिजे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आमची योजना बंद होणार नाहीत’ असल्याचे मोठे विदान व्यक्त केले आहे.ज्यामधून महिलांना मोठ्या प्रकारे दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या गोष्टी घरात नसावेत ?
- घरातील सदस्यांच्या नावावर चारचाकी (कार) नसावी (ट्रॅक्टर चालेल).
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किव्वा माजी आमदार/माजी खासदार नसावे.
- कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा अधिक नसावे.
- कुटुंबातील सदस्य भारत सरकार किव्वा राज्य सरकारच्या कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य नसावेत.
- कुटुंबातील सदस्य कर भरणारा (tax payer) नसावा.
- लाभ घेणाऱ्या महिला शासनाच्या इतर योजनांद्वारे 1500 रुपये किव्वा त्यापेक्षा अधिक रक्कमेचा लाभ नाही घेतला पाहिजे.
योजनेचा नाव | लाडकी बहिण योजना |
मर्यादा | महाराष्ट्र राज्य शासन |
रूपये रक्कम | 2100 |
अर्ज करण्याची पद्धत | online |
लाभ घेणारे | महाराष्ट्रातील महिला |
वयोगट | 21 ते 65 |
अर्ज करण्यासाठी पोर्टल | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |